Tuesday, 28 June 2011

प्रेम असते तरी काय ?

प्रेम असते तरी काय ? 
 कुणी मला सांगू शकेल का. प्रेम काय फक्त प्रियकराने प्रेयसी वर करायचे असते ?
तुम्ही म्हणाल आज १४ फेब्रुवारी तर नाही हा काय प्रेम , प्रेम बडबडतोय. पण मला सांगा प्रेम हि गोष्ट काय दिवस ठरवून करायची असते. प्रेम असते आईचे मुलावर भावाचे बहिणीवर ,आजीचे  नातवावर, प्रियकराचे  प्रेयसीवर.
                                                     

                               आज मी  बोलतोय कारण प्रेम हे अव्यक्त असते. काही माणसे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत . मी तर म्हणेन प्रेम हे अव्यक्तच असते . माणूस ज्या बंधनात आयुष्यभर राहू शकतो ते प्रेमच असते. प्रेम ही  ईश्वरी देणगी असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्वा  त्याला खर्या  प्रेमाची गरज भासते आपल्याला मिळालेल्या प्रेमाची कदर वेळीच करायची असते अन्यथा आयुष्यात आपण पैसा - अडका , संपत्ती सर्व कमवू शकतो पण खर्या प्रेमाला आपण पोर्केच राहतो. 
                                 आपल्या पैकी अनेकांच्या कानावर हिर-रानझा , लेला-मजनू , सलीम-अनारकली यांची नावे गेली असतील का ?  तर ती खर्या प्रेमाची उदाहरणे आहेत म्हणूनच ना  मग बाकीच्यांचे प्रेम प्रेम न्हावे काय ?
                                 प्रेम म्हणजे त्याग , एकमेकान प्रती वाटणारी आस्था , सुख असो व दुखः आपुलकीने केलेली विचारपूस. प्रेम म्हणजे आईने प्रेमाने केलेला दिवाळीचा फराळ, बहिणीने  हातात बांधलेली राखी, शाळेत असतांना चांगले काम केल्या बद्दल मिळालेली शाबासकी, मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा , देवळात गेल्या नंतर जोडला गेलेला हात ते देवाप्रती प्रेम असते. प्रेम करण्याचा हक्क सर्वांना असतो . कोणाला वाटेल आयुष्यात येऊन मला प्रेम करणारे कोणी भेटले नाही तर त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या सर्वांवर प्रेम करणारा ईश्वर आहे. त्याचे सर्वांवर लक्ष्य असते. तुम्हाला प्रेम करायचे असेल तर आपली आई, बहिण . वडील. आपले मित्र आणि आपल्या आजूबाजूची माणसे यांवर प्रेम करा . सर्वात  महत्वाचे आपले प्रेम व्यक्त करा .


                        खूपच वेडवाकड बोललो चुकल असेल तर माफ करा आणि हो लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
लवकरच परत भेटू .

Swagat

1 comment:

  1. hay very nice swagat. I really liked it very much.
    Now say and write something diffrent as usually.
    I am waiting for you new writtings.


    Madan

    ReplyDelete