Thursday 11 October 2012

हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे




हरे कृष्ण 


भक्तीमार्ग हि आज खूपच गरजेचा आहे परंतु भक्ती कशी करावी आणि कोणाची करावी हे
कळत नसल्यामुळे या मार्गावर लोकांची खूपच फसगत होते यासाठी मी आज थोडक्यात
श्री कृष्ण भक्तिविषयी सांगणार आहे......


आपल्या सर्वांच्या मनात असणारा भक्तीभाव हा श्री कृष्णा प्रती असावा ।
केलेले प्रत्येक कर्म , चांगल्या वाईट गोष्टी या फक्त श्री कृष्णा समर्प्रित असाव्यात ।
श्री कृष्णानी गीतेमध्ये विश्वास दिला आहे कि

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यांती पित्रुव्रता :।
भुतानि यान्ति भूतेज्या यान्ति माद्याजिनोपी माम ।।

श्री कृष्ण इथे म्हणतात कि देवतांची पूजा करणारे देवतानां प्राप्त होतात ,
पितरांची पूजा करणारे पितरांना प्राप्त होतात ,
भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात ,
आणि माझी भक्ती करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. ।।२५।।

हरे कृष्ण हरे कृष्ण । कृष्ण कृष्ण हरे हरे  ।।
हरे राम हरे राम । राम राम हरे हरे ।।


 पुन्हा भेटूया ...........
                                                                                                   - स्वागत  भोईटे 


Saturday 10 March 2012

मावलत्या या संध्याकाळी

मावलत्या या संध्याकाळी

आज खुप दिवस जाले काहि लिहिले नाही आज एक कविता खुप दिवसांपूर्वी लिहिलेली आठवतेय तीच लिहितोय बघा अवड़तेय का ?

मावलत्या या संध्याकाळी ....


मावलत्या या संध्याकाळी पुन्हा फिरून पहाताना

क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा


मावलत्या या संध्याकाळी सूर्य बिम्ब ते लाल गुलाबी

क्षणभर ते रंग उधली आण हळूच होई क्षितीजाखाली


मावलत्या या संध्याकाळी पुन्हा फिरून पहाताना
क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा


मावलत्या या संध्याकाळी काई वाटे त्या सुर्याला

उगावात्यास नमस्कार मावल्त्यास पाठ करी हीच जगाची रित खरी


मावलत्या या संध्याकाळी पुन्हा फिरून पहाताना

क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा


स्वागत भोईटे.