Tuesday 28 June 2011

प्रेम असते तरी काय ?

प्रेम असते तरी काय ? 
 कुणी मला सांगू शकेल का. प्रेम काय फक्त प्रियकराने प्रेयसी वर करायचे असते ?
तुम्ही म्हणाल आज १४ फेब्रुवारी तर नाही हा काय प्रेम , प्रेम बडबडतोय. पण मला सांगा प्रेम हि गोष्ट काय दिवस ठरवून करायची असते. प्रेम असते आईचे मुलावर भावाचे बहिणीवर ,आजीचे  नातवावर, प्रियकराचे  प्रेयसीवर.
                                                     

                               आज मी  बोलतोय कारण प्रेम हे अव्यक्त असते. काही माणसे प्रेम व्यक्त करू शकत नाहीत . मी तर म्हणेन प्रेम हे अव्यक्तच असते . माणूस ज्या बंधनात आयुष्यभर राहू शकतो ते प्रेमच असते. प्रेम ही  ईश्वरी देणगी असते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी अशी वेळ येते जेव्वा  त्याला खर्या  प्रेमाची गरज भासते आपल्याला मिळालेल्या प्रेमाची कदर वेळीच करायची असते अन्यथा आयुष्यात आपण पैसा - अडका , संपत्ती सर्व कमवू शकतो पण खर्या प्रेमाला आपण पोर्केच राहतो. 
                                 आपल्या पैकी अनेकांच्या कानावर हिर-रानझा , लेला-मजनू , सलीम-अनारकली यांची नावे गेली असतील का ?  तर ती खर्या प्रेमाची उदाहरणे आहेत म्हणूनच ना  मग बाकीच्यांचे प्रेम प्रेम न्हावे काय ?
                                 प्रेम म्हणजे त्याग , एकमेकान प्रती वाटणारी आस्था , सुख असो व दुखः आपुलकीने केलेली विचारपूस. प्रेम म्हणजे आईने प्रेमाने केलेला दिवाळीचा फराळ, बहिणीने  हातात बांधलेली राखी, शाळेत असतांना चांगले काम केल्या बद्दल मिळालेली शाबासकी, मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा , देवळात गेल्या नंतर जोडला गेलेला हात ते देवाप्रती प्रेम असते. प्रेम करण्याचा हक्क सर्वांना असतो . कोणाला वाटेल आयुष्यात येऊन मला प्रेम करणारे कोणी भेटले नाही तर त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या सर्वांवर प्रेम करणारा ईश्वर आहे. त्याचे सर्वांवर लक्ष्य असते. तुम्हाला प्रेम करायचे असेल तर आपली आई, बहिण . वडील. आपले मित्र आणि आपल्या आजूबाजूची माणसे यांवर प्रेम करा . सर्वात  महत्वाचे आपले प्रेम व्यक्त करा .


                        खूपच वेडवाकड बोललो चुकल असेल तर माफ करा आणि हो लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
लवकरच परत भेटू .

Swagat

Tuesday 21 June 2011

सुरुवात गप्पांची

                             |  गणपती बाप्पा मोरया | 



नमस्कार मित्रानो ,
आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात गणेशाला वंदन करून करतो आज पहिलाच दिवस आहे ब्लोग लिहिण्याचा. सुरुवात कुठून करावी हे लक्षात येत नाही ठीक आहे काही अनोपचारिक गप्पा मारुयात.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब गोष्टी मधून चांगल्या गोष्टी मिळवणे हे आपले प्रथम कर्तव्य असलं पाहिजे.
 एक गोष्ट विचार करायला लावणारी
एका खेडगावात एक साधू महाराज रस्त्याने चाललेले असतात वाटेत एक पानाच्या डोह साचलेले ते पाहतात त्यात एक विंचू असतो तो पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आसतो काढण्याचा प्रयत्न करतात तर to विंचू त्यांना चावतो असे दोन ते तीन वेळा घडते तरी ते आपला प्रयत्न सोडत नाहीत रस्त्यातून जाणारा एक माणूस त्यांना विचारतो कि विंचू चावत असताना सुद्धा ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न का करतात त्यावर ते महाराज त्यांना म्हणतात चावणे हा त्या विन्चुचा धर्म आहे तर वाचवणे हा माझा  धर्म आहे.

संतांची शिकवण हे वाईट सोडून चांगले  घेण्याची असते.

स्वागत.